रस्ता बांधकाम नित्कृष्ट दर्जाचा नागरीकांची ओरड

0
27

चित्रा कापसे/तिरोडा-प्रत्येक गावाचा विकास गाव गावांना जोडले गेल्यामुळे होईल या संकल्पनेतून गावातील रस्ते चांगले बांधण्याचे ध्येय सरकारने राबविले असून रस्त्याचा विकास व्हावा, नागरिकांना आवागमन करताना त्रास होऊ नये यासाठी सरकार विविध योजनेअंतर्गत रस्ते बनविण्याचे काम सुरू असते. परंतु हे रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना कंत्राट दिले ते कंत्राटदारच नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवित असल्याचे पांजरा ते खुरखुडी रस्त्याच्या बांधकामावरून पाहायला मिळाले.
तालुक्यातील पांजरा ते खुरखुडी दरम्यानचा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होती., ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. त्यामुळे येथे डांबरीकरणाचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग B & C योजनेअंतर्गत तयार व्हायला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे कंत्राट गोंदिया येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनी ला मिळाले आहे. परंतु, कंत्राटदार रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे करीत आहे. रस्त्यावरचे डांबर गायब झाले आहे. फक्त तिथे गिट्टी आणि चुरी टाकली जात आहे. त्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच उखडून जाईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सदर रस्त्याचे काम दर्जेदार होईल, याकडे लक्ष द्यावे व त्यांचे देयके थांबविण्यात यावे अशी मागणी होत आहे.

सदर रस्त्याचे बांधकाम मी कसा बनत आहे याची स्वतः जाऊन पाहणी करणार व कंत्राटदाराला चांगल्या दर्जाचा रोड बनवायला सांगणार.अभिजित खंडाळकर,कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा