36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ एम.मुरुगानंथम यांची बीड जि.प.च्या सीईओपदी बदली

एम.मुरुगानंथम यांची बीड जि.प.च्या सीईओपदी बदली

0
3740

blank

गोंंदिया,दि.१०ःगोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगांनथम यांची प्रशासकीय बदली सामान्य प्रशासन विभागाने केली असून त्यांना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक देण्यात आली आहे.तर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांची बदली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी छत्रपती सभांजीनगरच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.

एम.मुरुगांनथम यांनी गोंदिया जिल्हा परिषदेत रुजु होताच कर्मचारी व अधिकारी यांची दररोज आॅनलाईन कार्यशाळा घेण्याचा सपाटा लावलेला होता.यामुळे कर्मचारी कामात कमी व आॅनलाईन बैठकीतच अधिक व्यस्त राहयाचे.त्यामुळेच की काय यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मुख्यमंत्र्याच्या १०० दिवसीय कार्यक्रमात पहिल्या व दुसर्या टप्यात कुठेही दिसून आली नाही.तर ई आॅफिस सुरु केल्यानंतरही काही विभागातील कर्मचारी यांचे तक्रार चौकशी प्रकरणात ई आॅफिस मार्फेत पत्र आलेले नसतानाही सरळपध्दतीने त्यांचे हित जोपासण्याचे काम केल्याचे बघावयास मिळाले.मात्र त्यांच्यापासून काही कर्मचार्यांना चांगलेही शिकायला मिळाले.

आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी महिला कर्मचार्यांना शुल्लक कारणाकरीता निलबिंत करतांना मात्र सामान्य प्रशासन व आरोग्य विभागातीलच काही कर्मचारी कापड व वजन कमी करण्याचे साहित्यांची विक्री करणार्यांना सवलत दिल्याचे चित्र बघावयास मिळाले होते.

blank