
गोंदिया,दि.11: जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी “महिला लोकशाही दिन” आयोजित करण्यात येतो. सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी, प्रजित नायर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, महिला मंडळ, बचत गट यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील.
महिला लोकशाही दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय महिला कर्मचारी, महिला मंडळे, बचत गट आणि इतर महिलांसाठी आपल्या तक्रारी, अडचणी, न्यायविषयक मुद्दे, विविध योजनांसंबंधी अडचणी, सेवा विषयक विषय किंवा शासकीय कार्यालयांच्या अनुत्तरीत बाबींचे अर्ज सादर करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज सेवा विषयक अस्थापना विषयक बाबी तक्रार निवेदने वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर ते अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, असे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.