
वृत्तसंस्था
नवी दिल्ली- लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करुन मोदी सरकारचे मंत्री व्ही. के. सिंग यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप ठेवले आहेत. सुहाग म्हणाले की, “लष्कर प्रमुख असताना व्ही. के. सिंग यांनी चूकीच्या हेतूने आपले प्रमोशन रोखण्याचा प्रयत्न केला होता.” अशी घटना पहिल्यांदा घडली की एका लष्कर प्रमुखाने माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्र्यावर असे आरोप केले आहेत. व्ही. के. सिंग निवृत्त झाल्यानंतर गाझियाबादमधून भाजपचे खासदार झाले. आता जते विदेश राज्यमंत्री आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, जनरल सुहाग यांनी बुधवारी दाखल केलेल्या एफिडेव्हिटमध्ये म्हटले आहे की, ”2012 मध्ये मला तत्कालिन आर्मी चीफ जनरल व्ही.के. सिंग यांनी चूकीच्या हेतूने लक्ष्य केले होते. त्यांना माझे प्रमोशन थांबवायचे होते.”
”माझ्या विरोधात खोटे आरोप लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. माझ्यासोबत बेकायदेशीरपणे व्यवहार करण्यात आला.”
निवृत्त लेफ्टनंट जनरल रवी दस्ताने यांनी सुहाग यांच्या नियुक्ती विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. जनरल सुहाग यांनी याच याचिकेवर उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे आपले प्रतिज्ञापत्र सोपवले. दस्ताने यांचा आरोप आहे की, चौकशी न करता 2014 मध्ये सुहाग यांनी त्यांच्याआधी आर्मी कमांडर बनवल्या गेले.