
गोंदिया,दि.13- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया अंतर्गत 01 मे ते 15 जून तंबाखू नकार दिनानिमित्य 45 दिवसाच्या अभियाना अंतर्गत पोलीस मुख्यालय गोंदिया येथे तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य कार्यशाळा संपन्न झाली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व पोलीस उपनिरीक्षक(गृह) नंदिनी चांदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली.कार्यशाळा सोबत पोलीस मुख्यालय येथील अधिकारी आणि कर्मचारी यांची मौखिक तपासणी डॉ.ज्योती राठोड यांनी केली.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन तसेच कोटपा कायदा 2003 ची माहिती व कार्यवाही कलम ४ या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुखाचा कँसर, तोंड न उघड़ने, तोंडाचा व्यायाम, मानसिक आरोग्य सोबतच आना पान महँजे १० मिनिटाचे मेडिटेशन या बदल मार्गदर्शन मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी दिले.तंबाखूमुक्तीची शपथ सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर यांनी उपस्थितांना दिली. तसेच तंबाखू नियंत्रण पथकामार्फत पोष्टरच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.
यावेळी जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम,दंत टेक्निशियन यश जयस्वाल,सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, व दंत सहाय्यक विवेकानंद कोरे उपस्थित होते.