33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ भंडारा येथील प्रहार कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या समर्थनात केली विरुगिरी

भंडारा येथील प्रहार कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या समर्थनात केली विरुगिरी

0
74

blank

भंडारा,दि.१३ः शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, शेतमजूर, कष्टकरी यांच्या विविध मागण्यांसह खालील प्रमुख मागण्यांकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे कैवारी व दिव्यांगांचे हृदयसम्राट बच्चू कडू हे ८ जून २०२५ पासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे *बेमुदत अन्नत्याग आंदोलन* करीत आहेत.या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा ५ वा दिवस असून भंडारा येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून यशोदनगर परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी करीत आंदोलन केल्याने खळबळ उडाली.यावेळी वर्तमान जुलूमी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी आंदोलनास अंकुश वंजारी, विनोद वंजारी, चारुल रामटेके, तुषार मेंढे, आदेश मेश्राम, चिंतामण तिबुडे, पिंटू पटले, शहाजन बोकडे व अन्य प्रहार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.

blank