तिरोडा शहरातील गटार योजनेचे कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास

0
10

18 महिन्याचा कालावधी नियोजित
आठ महिन्यांत 65 टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण
चित्रा कापसे/तिरोडा-स्थानिक नगर परिषद क्षेत्रात आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने तिरोडा शहरातील गटार योजनेचे काम मंजूर झाले असून कामाला सुरुवात होऊन आठ महिन्याच्या ६५ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे .सदर काम हे 18 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करायचे उद्दिष्ट असल्याने युद्ध स्तरावर कामाची नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे .सदर काम 81.68 करोड रुपयाचे असून हे काम पी एल अडके नाशिक या कंपनींना मिळालेले असून त्यांचे अभियंता व मजूर लोक काम सतत करीत आहेत व यावर नगरपरिषद तिरोडा तसेच आमदार विजय रहांगडाले हे लक्ष ठेवून आहेत .
तिरोडा शहरातील गटार योजनेच्या कामाबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांना त्रासाबाबत तत्काळ कारवाई होण्याचे दृष्टीने नुकतीच नगरपरिषद कार्यालयात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर, पाणीपुरवठा अभियंता सचिन मेश्राम, कंत्राटधाराचे प्रमुख प्रतिनिधी मयूर वरोतरिया यांच्यात सभा घेण्यात आली व न .प.च्या वतीने कंत्राटदारांना विविध सूचना देण्यात आल्या. त्यात नागरिकांना त्रास होणार नाही व मानसून सुरू होत असल्याने खोदकामाचे कार्य बंद करण्याचे निर्देश दिले तसेच जिथे खोदकाम झालेले आहे त्या ठिकाणी गिट्टी व मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्याचे कंत्राटदारांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार कंत्राटदाराचे प्रतिनिधी मयूर वरोतरिया यांनी कामाची योग्य प्रकारे नियोजन करण्यात येईल व कोणतीही तक्रार प्राप्त होणार नाही अशी हमी दिली. त्यानुसार मुरूम आणि गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे असे निदर्शनात येत आहे.

मान्सून दरम्यान भुयारी गटारी खोदकामामुळे नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.आणि त्या कक्षाचे प्रमुख पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सचिन मेश्राम हे आहेत .

प्रतिक्रिया-नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच त्यांचे निवारण करून कामाचे गुणवत्ता लक्षात घेण्याचे काम नगर परिषद च्या वतीने करण्यात येईल तसेच नागरिकांना याबाबत काही त्रास असल्यास नगरपरिषद पाणीपुरवठा विभागात संपर्क साधावे तक्रारीचे पूर्णपणे तत्काळ निवारण करण्यात येईल.सचिन मेश्राम पाणीपुरवठा अभियंता

प्रतिक्रिया-खोदलेला रस्ता गिट्टी मुरूम टाकून दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले असून नागरिकांच्या सर्व तक्रारीची निवारण तत्काळ करण्यात येईल नगरपरिषद तिरोडा पर्यंत तक्रार होणार नाही याचे आम्ही काळजी घेऊ.मयूर वरोतरिया कंत्राटदार प्रतिनिधी.