30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पळसगाव/राका येथे नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन

पळसगाव/राका येथे नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन

0
48

blank

सडक अर्जुनी -तालुक्यातील पळसगांव/राका येथे ५५.५० लाख रुपयांच्या निधीतून नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्य सपना नाईक, संरपंच भारती लोथे, उपसंरपंच शोभा येरपुडे, ग्राम पंचायत सदस्य कुवर मेश्राम, सुभाष कापगते, सविता मलेवार, अर्विद सलामे, कुंदा सावरकर, पुजा कापगते, अशोक कापगते, खेमराज भेंडारकर, माजी सभापती गिरधारी हत्तीमारे, डॉ. अविनाश दोनोडे, CHO खेडकर, लक्षीकांत धानगाये, राजेश नंदागवळी, विवेक भेंडारकर, आत्माराम कापगते, तिलाराम कापगते, ललित डोंगरवार, रुपराम बावनकुडे, ग्रामसेवक शहारे ताई, मुकेश कापगते,राजकुमार उंदीरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी, या आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार असून हे उपकेंद्र ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

blank