
जिल्ह्यातील १० प्रतिनिधी होणार सहभागी
गोंदिया,दि.१९- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे राज्य अधिवेशन 22 ते 24 जून या कालावधीत नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.गोंदिया जिल्ह्यातून 10 प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत. उदघाटन सभारंभ 22जून ला पक्षाचे राष्ट्रीय सचिव व आयटक राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजित कौर, राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव एड. शुभाष लांडे, तेलंगाना राज्याची भाकप नेत्या कॉ. पाशा पद्मा, राज्य सह सचिव प्रा. राम बाहेती, राजू देसले आदींच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी सुरेश सावंत, डॉ. रावसाहेब कसबे, वरिष्ठ पत्रकार कुमार केतकर तथा कॉ. तुकाराम भस्मे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेकाप, सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी, भाकपा माले (लिब्रेशन)चे डाव्या आघाडीचे राज्य स्तरीय पदाधिकारी सहभागी होणार आहेत.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एड. जयंत जायभावे “भारतीय संविधान लोकशाहीचा गाभा”या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.प्रतिनिधी सत्रात राज्य सचिवकडून मागील तीन वर्षाचा राजकीय, संघटनात्मक आणि जनसंघटनाचा व पुढील कार्यक्रमाचा अहवाल सादर केले जाईल त्यावर राज्यभरातून आलेले 400 प्रतिनिधी सविस्तर चर्चा करणार आहेत.राज्य अधिवेशनात जिल्ह्यातून हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर,परेश दुरुगवार, अशोक मेश्राम, शालू कुथे, कल्पना डोंगरे, गुणवंत नाईक वि. एस. शहारे भाग घेणार.