32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

0
38

blank

गोंदिया,दि.१६– महाष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त शहरातील के.टी.एस जिल्हा सामान्य रुग्णालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना फळ वाटप केले.प्रत्येक रूग्णांशी संवाद साधत त्यांची काळजीपुर्वक दखल घेत मदत करण्यात येईल असे सुध्दा सांगितले.दरवर्षी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रमाणे उपक्रम राबविली जात असून यावेळी फळ वाटपण्याचे कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी मनसे गोंदिया शहर अध्यक्ष सुरेश नानु चौधरी, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष डिलेश (बालु) उके तसेच सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

blank