33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ढिवर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ढिवर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
43

blank

अर्जुनी मोरगाव : अखिल ढिवर समाज विकास समिती अर्जुनी मोरगावद्वारा समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम १५ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राध्यापक तथा ढिवर समाज प्रबोधनकार जनार्दन नागपुरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सनथ वाढई, कार्याध्यक्ष गिरधारी भोयर, सचिव गोविंद मखरे, तालुकाध्यक्ष राजू वलथरे, माधवन मानकर, अशोक शेंडे, सरिता मेश्राम, शालू कोल्हे, कृपाल मानकर, नितेश शहारे, वृंदा वलथरे उपस्थित होते. यावेळी राकेश कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांपुढे आपल्या जीवनाचे खडतर अनुभव कथन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ढिवर समाजातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इयत्ता १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन केशव कोल्हे, तर आभार यशवंत शेंडे यांनी मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये यामिनी रवींद्र मेश्राम, मयूरी रवींद्र मानकर, हर्षित फिरोज शेंडे, अतुल नारायण चांदेकर, उर्वशा देवदास मानकर, हर्षा राजेश मेश्राम, दुर्गेश नंदेश्वर कांबळे, गोपाल विलास भांगे, दीपाली वसंत मेश्राम, मोहिनी नामदेव सोनवणे, देवयानी श्रीकृष्ण गोपे तर इयत्ता बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये होमेश तेजराम कोल्हे, तेजस्विनी मधुकर वलथरे, तेजस्विनी नेमीचंद वलथरे, खुशी काशीराम वलथरे, साक्रीत यशवंत शेंडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता.

blank