40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ आणीबाणीच्या स्मृती जागवणारे छायाचित्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी नायर यांच्या हस्ते उद्घाटन

आणीबाणीच्या स्मृती जागवणारे छायाचित्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी नायर यांच्या हस्ते उद्घाटन

0
60

गोंदिया,दि.26: देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे. आणीबाणीच्या काळात ज्या नागरिकांनी लोकशाही व नागरिक स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तुरुंगवास पत्करला तसेच भूमिगत राहून कार्य केले, अशा नागरिकांचा इतिहास जनतेपुढे मांडण्यासाठी  छायाचित्र व माहितीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

नवीन प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक येथे आयोजित या कार्यक्रमाला  निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बैहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार समशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, उपजिल्हाधिकारी शुभम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच  नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनात आणीबाणी काळातील दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, तत्कालीन वृत्तपत्रांच्या कात्रणांचा समावेश असून, त्या कालखंडातील वातावरणाची कल्पना देणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आणीबाणीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सहभाग घेतलेल्या नागरिक व त्यांच्या वारसांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर प्रदर्शन दिनांक 28 जून 2025 पर्यंत सकाळी 10 ते 6 यावेळेत सर्व नागरिकांसाठी खुले असून या ऐतिहासिक प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.