35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांची ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे आकस्मिक भेट

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांची ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे आकस्मिक भेट

0
224

blank

गोंदिया,दि.२६ः-सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रान्वये जिल्हास्तरिय अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थाना भेटी देवुन तेथील स्वच्छता व सुरक्षा,औषध उपलब्धता,वैद्यकीय सुविधा,रुग्णांसमवेत सुसवांद याबाबत निर्देशकांची पाहणी करण्याच्या सुचना दिल्यात.त्या अनुषंगाने दि.24 जुन रोजी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी अतिदुर्गम  ग्रामीण रुग्णालय सालेकसा व ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट येथे आकस्मिक भेटी देवुन कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी त्यांचे सोबत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पवन राऊत,सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,सिकलसेल समन्वयक सपना खंडाईत,तालुका किटकशास्त्रज्ञ नागपुरे उपस्थित होते.
भेटी दरम्यान ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील प्रसुतीगृह,प्रयोगशाळा,आंतररुग्ण पुरुष व स्त्री वार्ड,औषधीसाठा,ई.ची पाहणी करुन लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिक्षक यांना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे,सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा,हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे.सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी.कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य करणे,जनआरोग्य समीतीच्या सभा नियमीत घेणे,कुपोषित अंगणवाडीतील बालकांचे तपासणी करुन कुपोषित बालकांना श्रेणीनुसार वर्गीकरण,टेलिकंन्सल्टेशन सेवेचे योग्य नियोजन करणे,पँलिटीव्ह आरोग्य सेवा,गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे,सोनोग्राफी व एक्स-रे केंद्र अँक्टिव्हेट करणे व आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बाबत विविध सुचना दिल्यात.
भेटी दरम्यान ग्रामीण रुग्णालय व ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांचेसह आरोग्य संस्थेतील संपुर्ण स्टाफ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

blank