34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ गोंदिया मेडिकल कॉलेजचा मुंबईतील बैठकीत आढावा

गोंदिया मेडिकल कॉलेजचा मुंबईतील बैठकीत आढावा

0
123

blank

गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आढावा बैठक बुधवारी (दि. २५) मुंबई येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त, खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेत मेडिकल कॉलेजचे बांधकाम उच्च दर्जाचे व वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी ही सुविधा म्हणजे एक वैद्यकीय व आरोग्यविषयक मैलाचा दगड ठरणार असल्याचे स्पष्ट केले.या मेडिकल कॉलेजकरिता ६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शहरालगत असलेल्या कुडवा येथे अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारत उभारण्यात येत आहे.यात ४०० खाटांची रुग्णसेवा, आधुनिक आयसीयू, एमसीएच युनिट, शस्त्रक्रियागृह तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, प्रशस्त मैदान व सांस्कृतिक केंद्र, संवादात्मक अध्यापन कक्ष यांचा समावेश असणार आहे. या बार्बीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत चर्चा करून योग्य सूचना करण्यात आल्या.

नागरिकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा
सध्या या मेडिकल कॉलेजमध्ये १५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे. तर भविष्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. गोंदिया येथील मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाला वेग येईल व उत्तम व दर्जेदार बांधकाम होईल, असा विश्वास यावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.