
सालेकसा,दि.२६ः येथील पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या खोलगड परिसरात गांजाची अवैध साठवणूक व विक्री होत असलेल्या गुप्त माहितीवरून कारवाई करत ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. यामध्ये अंदाजे २.६६६ किलो गांजा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, एकूण मुद्देमालाची किंमत रु. ५३,३२०/- इतकी आहे.25 जून 2025 रोजी सकाळी 10:20 ते दुपारी 3:40 वाजेच्या दरम्यान सालेकसा पोलीस निरीक्षक भुषण यादोराव बुराडे यांनी जियालाल शिवली नागपुरे (वय 81, रा. खोलगड, ता. सालेकसा) यास आपल्या ताब्यात गांजाचा साठा बाळगून विक्रीसाठी ठेवल्याने सापळा रचून अटक केली.आरोपीच्या घराची झडती घेतले असता गांजाने भरलेला थैला आढळून आला. त्यामध्ये 2.666 किलो ओलसर हिरवट-बिमिश्रीत गांजा, लालसर पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला (अंदाजे किंमत रु. 53,320/-)RP55 Paddy लिहिलेला थैला आढळून आला.कायदेशीर कारवाई करीत सदर प्रकरणी आरोपीवर औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहेत.