39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र राज्यातील ८५ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या,डोंगरे गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधिक्षक

राज्यातील ८५ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या,डोंगरे गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधिक्षक

0
532

blank

गोंदिया,दि.२७ः राज्य पोलीस दलातील आयपीएससह राज्य पोलीस सेवेतील जवळपास ८५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश आज गृह विभागाने काढले.यात संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून पदस्थापनेपासून वंचित राहिलेल्या काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांची नागपूर शहर उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.तर अकोल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे हे गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधिक्षक राहणार आहेत.तर चंद्रपूर आयआरबी ४ च्या समादेशक भाग्यश्री नवटके यांची गोंदियात आयआरबी २ च्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे.

    बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांड घडल्यावर उचलबांगडी करण्यात आलेले तत्कालिन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना मराठवाड्यातील लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून पाठविण्यात आले आहे.
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank

blank