34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक हरिराम येळणे गुरूजी यांची राज्य आदर्श शिक्षक म्हणून निवड

हरिराम येळणे गुरूजी यांची राज्य आदर्श शिक्षक म्हणून निवड

0
887

blank

शिर्डी येथे होणार सत्कार
गोरेगाव –गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमसरचे मुख्याध्यापक हरिराम येळणे यांची राज्य आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली आहे. शिर्डी येथे दिनांक 29 जून 2025 रविवारी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 आयोजित करण्यात आले आहे. राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष डॉ. पोपटराव पवार यांच्या हस्ते हरिराम येळणे गुरूजी यांना शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, साहित्यिक कार्य व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरवण्यात येणार आहे. हरिराम येळणे गुरूजी हे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना गोंदिया चे जिल्हा अध्यक्ष, ओबीसी सेवासंघाचे जिल्हा मार्गदर्शक, तेली समाजाचे सेवा आघाडी अध्यक्ष, ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सल्लागार असून शैक्षणिक क्षेत्रात उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. या पुरस्कारासाठी सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

blank