गोंदिया येथे “कृषि दिवस” उत्साहात साजरा

0
40

गोंदियादि.2 जुलै : जिल्हा परिषदेच्या वतीने गोंदिया येथे “कृषि दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया लायकराम  भेंडारकर, त्यांच्यासोबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानावडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थित लाभार्थी, शेतकरी व नागरिकांना कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी आवाहन केले.

        या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व शाश्वत शेतीच्या दृष्टीने उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास विविध भागांतून शेतकरी व हितधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.