जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण पोहचले जांभुळपणी गावात

0
87

गोंदिया,दि.०३ः- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी गोरेगाव तालुक्यातील कुर्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र पिंडकेपार येथील जांभुळपाणी गावाला भेट देवुन कार्यक्षेत्रात किटकजन्य कार्यक्रमाची होत असलेल्या कामाची पाहणी केली.

जाभुंळपाणी गावात दिवटे परिवारातील एकच घरातील तीन लोकांना हिवतापाची लागण झाल्याने आरोग्य विभागामार्फत त्या गावात हिवतापविरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.सदर गावात सुरु असलेल्या किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी करण्याकरीता जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी थेट जांभुळपाणी गावातील  दिवटे परिवाराच्या घराला भेट दिली.यावेळी हिवताप दुषित तीनही लोकांची प्रकृतीची विचारपुस करुन दिल्या जात असलेल्या औषधोपचाराची माहिती जाणुन किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी केली.गावात आशा सेविका व आरोग्य कर्मचार्यामार्फत ताप रुग्ण व कंटेनर शोध मोहिमेची माहीती जाणुन घेतली.

जांभुळपाणी गावात जैवशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे यांचे मार्फत मलेरिया पसरवणाऱ्या डासांची घनता तपासण्यात येत होती.डॉ.चव्हाण यांनी त्याबाबतची सुद्धा माहीती जाणुन घेतली.यावेळी अनिल चोरवाडे यांनी हिवतापाला कारणीभुत असणारी डास प्रजाती अ‍ॅनाफिलीस नळकांडी मध्ये दाखविली.गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु होती त्यात प्रामुख्याने जलद ताप सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण,किटकशास्त्रीय सर्वेक्षण,डि-लार्वा कार्यवाही प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्हाडीच्या वतीने सुरु होती.सदर पथकामध्ये किटक समारक जाईभाई,आरोग्य सहाय्यक रवि कटरे,आरोग्य सहायिका मालती भराडे,आरोग्य सेवक डी.एस.लाडे,एच.एम.कटरे,किशोरे सुरजजोशी,जगदिश उके,धिरज माहोरे तसेच आरोग्य सेविका एल.डी.पटले,एस.के.पटले, एम.एम.बिलवणे,आय.वाय.रहांगडाले आशा सेविका चंपा रहांगडाले यांचा समावेश होता.

भेटी दरम्यान डॉ.चव्हाण यांचे सोबत जैवशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे,तालुका पर्यवेक्षक रवि पटले,राजु मेश्राम, आरोग्य सहाय्यक कमल डोंगरे उपस्थित होते.