
गोंदिया, दि. 03 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा 2025-26 चे जिल्हास्तरीय आयोजन 8 ते 10 जुलै 2025 या कालावधीत स्व. इंदिरा गांधी स्टेडियम, गोंदिया येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलांच्या व 17 वर्षांखालील मुले/मुलींच्या वयोगटात सामने खेळविण्यात येणार आहेत. 15 वर्ष वयोगटासाठी खेळाडूचा जन्म दिनांक 1 जानेवारी 2011 किंवा त्यानंतरचा, तर 17 वर्ष वयोगटासाठी 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी 4 जुलै 2025 पर्यंत आपल्या संघांची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत करावी.
स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघांसाठी www.subrotocup.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, स्पर्धेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अनिराम मरसकोले यांनी केले आहे.