विकास कामात गती निर्माण करा- पुलकित सिंह

0
19

सिदेंवाही तालुक्यातील विकास कामाची पाहणी

चंद्रपूर ,दिनांक 3 जुलै 2025 – चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी नुकताच सिदेंवाही तालुक्याचा दौरा केला असून, सिदेंवाही तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन, पाहणी केली आहे. या भेटी दरम्यान गावातील विकास कामे गतीने निर्माण करा. कामात गती आणा असे सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह यांनी केल्या ‌.

सर्वप्रथम सिंदेंवाही पंचायत समितीमध्ये सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला यामध्ये कामात पारदर्शकता ठेवून कामे करा. सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करा .अशा सूचनाही पुलकित सिंह यांनी दिली आहे. यावेळी पुलकीत सिंह यांनी सिंदेंवाही तालुक्यातील काही गावातील विकास कामांची पाहणी केली . यावेळी पेडगाव या गावात व्हिजिट देऊन, गावातील शाळा व अंगणवाडी , मोहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जामसाळा ग्रामपंचायत ला भेट देऊन ग्रामपंचायतच्या कामकाजाची विचारणा केली. नवरगाव येथील नव्याने तयार झालेले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पची पाहणी करून, गावातील कचऱ्याचे  वर्गीकरण करून, सर्व प्रकारचा कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात रोज आणावा .गावातील कचरा रोज गोळा करावा .अशा सूचना केल्या. यासोबतच मामा तलाव दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून यंत्रणेला योग्य ते निर्देश दिले . यावेळी पंचायत समिती सिंदेंवाहीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे तथा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.