मुंडीपार येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
12

गोरेगाव,दि.०३ः तालुक्यातील मुंडीपार ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. 2 मध्ये आखरटोली येथे कोहमारा रोड ते ममताताई धामगाये यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास मुंडीपार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रेमलता ताई राऊत, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर शहारे,राजाभाई खान ग्रामपंचायत सदस्य, प्रलय धामगाये तसेच रोहित पांडे, सुनील वाघाडे, अजय नेवारे, शिवा बिसेन, राहुल राऊत, राजु भोयर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी परिसरातील नागरिकांनी सिमेंट रस्त्याच्या कामासाठी समाधान व्यक्त केले असून लोकवस्तीतील नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे डॉ. भगत यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.