
आमगांव : आमगांव नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत बसस्थानक चौक, गांधी चौक, कामठा चौक, आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यांच्या मधोमध गाई व पाळीव प्राण्यांनी आपला ठिय्या मांडल्याने वाहनचालकांना (Driver) कमालीचा त्रास होत आहे.आमगांव येथील या मुख्य रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा (Animals) त्रास सहन करावा लागतो. पशुमालकांचे (Animal Owner) याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्राणी दिवसभर रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. वाहनचालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना (Principal) याबाबत माहिती दिली. परंतु आजपर्यंत, रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या पाळीव प्राण्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमगांव शहराच्या मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांच्या मालकांवर त्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती जनतेने केली आहे.