37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डी.एम.एल.टी. परीक्षेमध्ये घवघवीत यश

एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डी.एम.एल.टी. परीक्षेमध्ये घवघवीत यश

0
107

blank

गोंदिया : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई, अंतर्गत घेण्यात येणाऱ्या डी.एम.एल.टी. या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल ०५ जुलै ला लागला असुन या मध्ये एम. जी. पॅरामेडिकल कॉलेज मुर्री चौकी, गोंदियाच्या ९८टक्के निकाल लागलेला आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या परिक्षे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. निकीता राणे या विद्यार्थीनीने ९०.२२टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
कु. आचल येळे ८९.२२टक्के, कु. साक्षी गौतम ८८.४४टक्के, कु. अल्का भगत ८७.७८टक्के, कु. गीता गहाने ८६.३३ टक्के, गुण घेऊन यश संपादन केलेला आहे.
जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय कॉलेजचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. मनीष चैधरी, प्रा. सौरभबघेले, प्रा. आकाश श्रोते, प्रा. सम्येक गणवीर, राजु रहांगडाले, राजा उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे, व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

blank