33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक विठू अवतरला शाळेत… मुरली येथे आषाढी एकादशी निमित्त साकारली दिंडी

विठू अवतरला शाळेत… मुरली येथे आषाढी एकादशी निमित्त साकारली दिंडी

0
89

blank

यवतमाळ/ दि८—मुरली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी भक्तीचा उत्सव साजरा केला. या वेळी संपूर्ण शाळा परिसर ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजराने दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिपाठ, अभंग, भजन यांचे सादरीकरण केले. वारकऱ्यांच्या वेशातील बालचमूने दिंडी काढून विठ्ठलभक्तीचा जागर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विठोबाच्या पादुकांची मिरवणूक करत शाळेच्या परिसरात फेरी मारली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावासोबतच आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेचे शिक्षक पांपटवार सर, चव्हाण सर विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगून सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक केंद्रे सर,शिक्षक कोरपकवाड सर,कारलेवाड सर,धनवे सर,पांपटवार सर,बाचे सर,चव्हाण सर शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी च्या राचटकर ताई आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली

blank