37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मासूलकसा घाटात उड्डाण पुलाला पडल्या भेगा,रस्त्यावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक

मासूलकसा घाटात उड्डाण पुलाला पडल्या भेगा,रस्त्यावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक

0
85

blank

गोंदिया,दि.०८ : बारा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या पावसाने मंगळवारी शहरातसह संपूर्ण जिल्हाला पावसाने झोडपले.जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाट परिसरात दरड कोसळल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासूनच संततधार सुरू झाली.  यंदाच्या मोसमातील आज सर्वाधिक 116.4 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 226.5 मिमी पाऊस देवरी तालुक्यात नोंदला गेला. अर्जुनी मोर 206.9 मिमी, तिरोडा 120 मिमी, गोंदिया 79.9 मिमी, सालेकसा 75.7, सडक अर्जुनी 74 मिमी, गोरेगाव 59.5 मिमी आणि आमगाव तालुक्यात 53.2 मिमी पावसाची नोंद झाली. . पुजारीटोला धरणाचे गेट उघडण्यात आले. जिल्हयातील नदी नाल्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.blank

देवरी तालुक्यातील मरामजोब मासूलकसा घाट परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वरील उड्डाण पुलाला पहिल्याच पावसात भेगा पडल्याने अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघड पडले आहे.अवघ्या सहा महिन्यापूर्वी मासूलकसा घाट परिसरातील उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसात महामार्गाला तडे पडले, यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

धरणांतील साठ्यात वाढ

जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला होता. दोन दिवसातील जोरदार पावसाने सर्वच धरणांतील साठ्यात वाढ झाली आहे. 9 मध्यम प्रकल्पात 15.10 दलघमी, 20 लघु प्रकल्पांत 16.590 दलघमी, 38 मामा तलावांत 2.596 दलघमी असा 23.685 दलघमी साठा झाला आहे. तिरोडा तरलुक्यातील भूराटेला मध्यम प्रकल्प 97.42 टक्के भरला आहेे. मोठया प्रकल्पांती साठ्याचा विचार केल्यास पुजारीटोला 45 टक्के, कालीसरार 10 टक्के, सिरपूर 14 टक्के, इटियाडोह 26 टक्के साठा झाला आहे.

blank