
गोंंदिया,दि.०९ः- जिल्ह्यात दि.7 व 8 जुलै पासुनच्या सततधार पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे.सालेकसा व आमगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी आल्याने पुर परीस्थिती निर्माण झाली आहे.भजेपार-नदीटोला-माताटोला मार्गावर वाघनदीचे पुराचे पाणी गावात शिरल्याने काही मार्ग पुरामुळे बंद झाले आहे.सदर पुरग्रस्त गावातील गरोदर मातांना प्रसूती संबंधाने आरोग्याची निकड व गुंतागुंत न होण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भजेपार कार्यक्षेत्रातील दोन गरोदर मातांना वेळीच प्रसंगावधाने ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अँबुलंन्स वाहनाने हलविलेची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शितलप्रसाद म्हैसकर यांनी दिली आहे. दि. 8 जुलै रोजी सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत भजेपार उपकेंद्रातील अतिवृष्टी पुरग्रस्त गावामध्ये प्रशासनाच्या चमुमध्ये सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार,प्राथमिक आरोग्य अधिकारी सातगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शितलप्रसाद म्हैसकर, भजेपार उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश कटरे,आरोग्य सेविका ईशा रहील व विद्या बाहेकर,आशा सेविका रमिता ब्राम्हणकर यांनी विशेष तत्परतेने दोन्ही गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पुर परिस्थिती मुळे आरोग्य निकड म्हूणन भरती केले.ग्रामीण रुग्णालय आमगावचे वैद्यकीय अधिक्षक यांनी या प्रसंगी दोन्ही गरोदर मातांना भरती करुन आरोग्य सेवा प्रदान करित आहे.





