37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता सडक अर्जुनी येथे वाहनावर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू तर तिन जखमी

सडक अर्जुनी येथे वाहनावर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू तर तिन जखमी

0
26

blank

गोंदिया,दि.०९ः जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली असून देवरी तालुक्यातील अनेक रस्ते बंद पडले आहेत.त्यातच आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर, SBI बँकेसमोरच्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक जुने आणि मोठे झाड समोरून येणाऱ्या ओमनी कारवर कोसळले.यात दुर्दैवाने वासुदेव मसाराम खेडकर वय-60,आनंदराव मनिराम राऊत वय-50 दोन्ही रा.- सडक अर्जुनी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.तसेच ऋतिक राजेश दिघोरे,वय -22,रा.सडक अर्जुनी,राजू रुपलाल चौरागडे वय-46,रा.गोंदिया व
अनिल रामकिसन चौधरी वय-46 हे तिघे जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल करुन उपचार सुरू केले आहे.नगर पंचायत,सडक अर्जुनी आणि Highway Police यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावरून झाड हटवले असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे.

blank