37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ककोडी-चिचगड मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून

ककोडी-चिचगड मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून

0
27

blank

गोंदिया- मुसळधार पावसामुळे देवरी तालुक्यातील ककोडी-चिचगड मार्गावरील ककोडी जवळील नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील पर्यायी पूल नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना आज, बुधवार ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेमुळे ककोडी-चिचगड मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे नदी व नाले ओसंडुन वाहत असताना अनेक नाल्यांना पुर आले आहे. त्यात देवरी तालुक्यातील ककोडी गावाजवळ चिचगड मार्गावरील पुलाला तोडण्यात आले असून सद्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे.

पावसाळ्यापूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने कंत्राटदारांमार्फत पूलाच्या शेजारीच माती व मुरुमाचा भरणा करून पर्यायी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पुर येऊन आज, सकाळच्या सुमारास सदर पर्यायी पूल वाहून गेला. विशेष म्हणजे, ककोडी ते चिचगड हा एकच मार्ग असल्याने व दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने ककोडी ते चिचगड या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद झाली आहे.
तालूका देवरी
डवकी-शिलापूर-फूकीमेटा
मूरदोली-चिचेवाडा
बोंडे-घोनाडी
फूटाना-हळदी
पळसगाव-तूंमडीमेढा
हे मार्ग बंद आहेत

blank