34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाण,आज लातूर बंदची हाक

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाण,आज लातूर बंदची हाक

0
91

blank

लातूर-कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे (Vijaykumar Ghadge Attack) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, विजयकुमार घाटगे यांनी रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया दिली असून, ही घटना सत्तेच्या माजाचे प्रतीक असल्याचं ते म्हणाले.

विजयकुमार घाटगे यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही फक्त निषेध करण्यासाठी आणि मागणी नोंदवण्यासाठी सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेला गेलो होतो. कृषीमंत्री कोकाटे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं – शेतकरी कर्ज घेऊन लग्न करतात आणि नंतर कर्जमाफी मागतात! आता रमी खेळतानाचे दृश्‍य समोर आलं. अशा व्यक्तीला कृषीमंत्री ठेवणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. आम्ही केवळ प्रतिकात्मक विरोध केला, पत्ते दाखवले आणि विनंती केली की, त्यांना त्या पदावरून हटवा.”

घाटगे पुढे म्हणाले, “पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही खाली बसून पत्रकारांशी बोलत होतो. तेवढ्यात ५०-६० लोकांचा जमाव आला आणि ‘पत्ते भिरकावतोस काय?’ असं म्हणत बेदम मारहाण सुरू केली. आम्हाला अक्षरशः रक्तबंबाळ केलं गेलं. यामागे फक्त सत्तेचा माज आणि गुंडगिरी होती. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झाला, हे लाजिरवाणं आहे.”या वेळी राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोड, बाबासाहेब पाटील, आणि लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे उपस्थित होते. तरीही ही मारहाणीची घटना रोखली गेली नाही, याकडे घाटगे यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, सध्या विजयकुमार घाटगे रुग्णालयात उपचार घेत आहेत. छावा संघटनेचे इतर कार्यकर्तेही या घटनेने संतप्त असून, लातूर बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुढील काळात हा मुद्दा आणखी भडकण्याची शक्यता आहे.

blank