
तिरोडा-वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन भीवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा गोंदिया चे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांचा मार्गदर्शन कार्यक्रम जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्राचार्य डी आर गिरीपुंजे ,तालुका संघटक संजय कटरे ,तालुका अध्यक्ष उमाशंकर पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ. प्रकाश धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जगात भूत, भानामती, जादूटोणा कुठेही नाही हे असल्यास सिद्ध करून दाखवा आणि लाखोचे बक्षीस मिळवा असे कित्येक वर्षापासून जाहीर आव्हान देण्यात आलेले असून सुद्धा आजपर्यंत या आव्हानाला कोणीही स्वीकारले नाही व सिद्ध करून सुद्धा दाखवले नाही. समाजात ढोंगी बाबा जे फिरतात ते काही जादूचे प्रयोग म्हणून वैज्ञानिक प्रयोग करतात व हात चलाखी करून भोळ्या भाबड्या जनतेला फसवतात त्यामुळे आपण त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे .साप चावल्यास सरकारी दवाखान्यात जाऊन योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच यावेळी विविध प्रात्यक्षिके करून दाखविले त्यात कानाने चिठ्ठ्या वाचणे, जळता कापूर तोंडात घेणे, लिंबूतून रक्त काढणे ,लिंबूतून विविध वस्तू काढणे असे विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांसमोर पोलखोल करून दाखवले व मनोरंजनही केले .काही सुरस कहाण्या सुद्धा सांगितल्या .
यावेळी प्राचार्य डी आर गिरीपुंजे यांनी सुद्धा जादूटोणा कुठेही नसतो भुताविषयीची कहाण्या सांगून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले व असे भूत कुठेही नसतात हे विद्यार्थ्यांना पटवून दिले .तसेच उमाशंकर पारधी यांनी तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे जगता येते यावर विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांकडून घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डी एस बोदेले तर आभार प्रदर्शन जी एन बिसेन यांनी केले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.




