39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ शिक्षण बचाव मोहिमे अंतर्गत सविधान मैत्री संघ तिरोडाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

शिक्षण बचाव मोहिमे अंतर्गत सविधान मैत्री संघ तिरोडाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

0
45

blank

चित्रा कापसे/तिरोड़ा-शिक्षण बचाव -शाळा बचाव मोहिमेंतर्गत प्राथमिक शिक्षण हे शासनाचं मूलभूत कर्तव्य आहे ते प्रत्येक बालकाचे फक्त आहे बालकाचे हक्क शास्त्राच्या वतीने हिरावून घेऊ नये या उदात उद्दिष्ट दृष्टीकोनातून प्राथमिक शिक्षण बचावासाठी तिरोडा तालुक्यातील संविधान मैत्री संघ तिरोड़ा च्या वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

तहसील तहसीलदार यांना निवेदन सादर करत असताना  प्रामुख्याने एडवोकेट नरेश शेंडे,सुरेश बंसोड, सरपंच अजित ठवरे,माजी नगरसेवक भोंदेकर, विलास मेश्राम, रिंकू टेम्भेकर, लंकेश जनबंधु आदि आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.शिक्षण शिक्षण आरोग्य हे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत या मूलभूत बाबीकडे शासन दुर्लक्ष करून शाळा बंद करण्याचे घाट घातले जात आहेत.हे घटनाविरोधी आहे. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणू नये याकरिता मैत्री संघ तिरोडाच्या वतीने माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे यावेळी गावातील मान्यवर व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank