
अमरावती दि. २९ :पाण्याची टाकी पडल्याने आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. ही घटना अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील आदिवासी आश्रम शाळेत घडली आहे.
सुमरती सोमा जामुनकर असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथे वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळा आहे. आज मंगळवारी सायंकाळी आश्रम शाळेतील पाण्याची टाकी अचानक पडल्याची घटना घडली. यावेळी टाकीच्या जवळ उभे असलेल्या तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. पाण्याची टाकी पडल्याने गंभीर अवस्थेतील सुमरती जामुनकर हे आदिवासी विद्यार्थिनी उपचारादरम्यान दगावली. घटनेनंतर शाळेतील कर्मचारी व नागरिकांनी जखमींना तात्काळ अचलपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल. घटनेची माहितीच मिळतात गावकरी व आदिवासी नागरिकांनी शाळेत धाव घेतली. हा प्रकार का घडला व या जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून व मृत तथा जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केला जात आहे.
दरम्यानआश्रम शाळा भाजपचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांचे असल्याचे माहिती पुढे येत आहे.अमरावती विभागाचे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.





