37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ थकलेल्या देयकांच्या विवंचनेमुळे कंत्राटदार फुंडे यांचा मृत्यू

थकलेल्या देयकांच्या विवंचनेमुळे कंत्राटदार फुंडे यांचा मृत्यू

0
946

blank

पत्र परिषदेत कंत्राटदारांचा आरोप

आमगाव : गेल्या ३ ते ४ वर्षापासून शासकीय कामांचे देयक शासन दरबारी अडकले आहे. परिणामी कंत्राटदार कर्जाच्या बोझ्याखाली सापडला आहे. त्यामुळे कंत्राटदार थकलेल्या देयकाच्या विवंचनेत मृत्यूला कवटाळत आहेत, असा आरोप कंत्राटदारांकडून करण्यात आला आहे. गेल्या ३ वर्षापासून मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या कामाचे कुशल कामांसाठी पुरविण्यात आलेल्या साहित्याचे पैसे मिळाले नाही, यामुळे सातत्याने आर्थिक विवंचनेमुळेच कंत्राटदार अशोक शंकरराव फुंडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. राज्य शासन देयक अडवून कंत्राटदारांच्या जीवावर बेतली आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. गेल्या मागील तीन वर्षापासून मग्रारोहयो योजनेंतर्गत कुशल कामांचे देयके शासन दरबारी अडकले आहे. शासनाकडून यंत्रणेला निधी पाठविण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटदार निधीसाठी कार्यालयांचे पायपीट करीत आहेत. कर्जबाजारी झालेल्या कंत्राटदार चांगलाच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आमगाव तालुक्यातील कंत्राटदार अशोक फुंडे यांच्या गेल्या तीन वर्षापासून कुशल कामाचे देयक अडकले होते. त्यामुळे ते सतत चिंतेत राहयचे त्यातच हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या याला राज्य शासनाचा तुघलकी कारभारच जबाबदार असल्याचे आरोप कंत्राटदारांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केला आहे. राज्य शासन झालेल्या कामांचे देयके काढण्यासाठी निधी वाटपात देखील सावत्र भूमिका अवलंबवित आहे. काहींचे पैसे देण्यात आले तर काही कंत्राटदारांचे पैसे सोयीस्करपणे अडविण्यात आले आहे. तिजोरीत पैश्याचा ठणठणाठ असल्याचा नाहक उहपोह केला जात आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेल्या कंत्राटदार प्रत्येक्ष अप्रत्येक्ष पणे मृत्यूला कवटाळत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आयोजित पत्रपरिषदेत कंत्राटदार सिद्धार्थ डोंगरे, राजू नायडू, केदार येडे, अतुल चौहान, रणजित पटेल, आफताब कुरेशी, राजू शेंडे, डॉ. हरिणखेडे, मेंढे, राजू चाचणे, उमेंद्र खोब्रागडे, संजू देशकर, धर्मराज पाथोडे आदी आदी उपस्थित होते.

blank