35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

0
82

blank

देवरी : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून डोंगरगाव/सुंदरी येथील एका ४७ वर्षीय शेतकऱ्याने शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना (ता. ३०) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. गजानन अंताराम वारई (४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील डोंगरगाव/सुंदरी येथील गजानन वारई हे त्यांच्यावर असलेले कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांची मानसिकता खचली होती. काल दुपारच्या सुमारास गजानन वारई घरुन बाहेर गेले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने कुटूबियांनी त्याची आजूबाजूला गावात शोधाशोध केली. मात्र ते आढळून आले नाही.३० जुलैला पहाटेच्या सुमारास गजानन अंतराम वारई यांचा मृतदेह शेत शिवारालगत झाडाला फासावर टांगलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच कुटूंबिय घटनास्थळी दाखल होवून याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी चिचगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक शेतकऱ्याच्या मागे पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. नापिकी व सतत वाढत असलेला कर्जाचा डोंगरामुळेच त्रस्त होवून शेतकऱ्याने आत्महत्या केली? अशी चर्चा असून मृत शेतकऱ्याच्या कुटूंबाला शासनाने आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

blank