
आमगावः-आमगाव नगरपंचायतची प्रशासकीय अनियमितता संपवून लवकरात लवकर निवडणुका जाहीर करून प्रस्थापित लोकप्रतिनिधींमार्फत विकार-कार्ये सुरू व्हावीत, या मागणीसाठी ‘आमगाव नगरपंचायत संघर्ष समिती’ ने जिल्हाधिकारी नायर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात, आमगाव नगरपंचायतीची १५ ऑगस्टपूर्वी बहाली करावी आणि तातडीने निवडणुकीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदन देताना माजी आमदार भैरसिंह नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर, संघर्ष समितीचे संयोजक घनश्याम अग्रवाल, राजेश शिवनकर, संतोष श्री-खंडे, कैलाश तिवारी, धनलाल मेंढे, मोहन वानखेडे, श्यामा शिवनकर, योगेश येटरे आदी मान्यवर उपस्थित होते. संघर्ष समितीने प्रशासनाकडे मागणी करत स्पष्ट केले की, लोकशाही मुल्यांचे रक्षण करून स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्रिय ठेवणे ही शासनाची जबाबदारी आहे.





