34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ ‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
44

blank

गोंदिया, दि.7 : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान दि.2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

        पहिल्या टप्प्यात तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करुन उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करुन ते सैनिक, पोलिसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे, स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटींग करणे असे विविध उपक्रम आहेत.

        दुसऱ्या टप्प्याची सुरुवात 9 ऑग्स्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तिरंगा वाहन रॅली किंवा सायकल रॅलीसुध्दा काढण्यात येणार आहे.

        तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

blank