
सडक अर्जुनी : माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालय एरिया ५१ कोहमारा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक जितेंद्र मौर्य, सेवानिवृत्त प्राचार्य मंजूताई चंद्रिकापुरे, शिवसेनेच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष सरिताताई कापगते, शिवसेना तालुका महिला प्रमुख सिंधुताई बारसागडे, महिला युवक प्रमुख पूजा राऊत, माधवराव तरोने, अनिता बांबोडे, संध्याताई श्रीरंगे, वंदनाताई डोये, करुणाताई गेडाम, शुभांगी वाढवे, सरिता वैद्य, समीक्षा उदापूर, नीलिमा गणवीर, उषा यावलकर, रेखा काटेंगे, उज्वला ब्राह्मणकर प्रतिभा गोटेफोड, वनिता पाथोडे, साक्षी बनकर, रूपाली सारंगपुरे, दीक्षा बडोले, महानंदा जनबंधू अस्मिता बडोले, कविता भंडारकर डारकर, प्रीती थेर, सत्यशीला साखरे, सोनाली बांबोडे शिल्पा बांबोडे, राखी जनबंधू, आरती वालदे, रेखा मेश्राम, वर्षा उके, ज्योती राऊत, निशा राऊत, ज्योती पंचभाई पद्मा डोय, मोनिका लंजे, सरिता मेश्राम, यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विषद करून व्यक्त केले. तर माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सोबतच पक्षाच्या कार्यपद्धती विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





