‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. यामध्ये काँग्रेस, सपा, आप, द्रमुक यासह अनेक पक्षांनी यात भाग घेतला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत.
11 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार; संसदेपासून मोर्चाला सुरुवात
आज जब हम चुनाव आयोग से मिलने जा रहे थे, INDIA गठबंधन के सभी सांसदों को रोका गया और हिरासत में ले लिया गया।
वोट चोरी की सच्चाई अब देश के सामने है।
यह लड़ाई राजनीतिक नहीं – यह लोकतंत्र, संविधान और ‘एक व्यक्ति, एक वोट’ के अधिकार की रक्षा की लड़ाई है।
एकजुट विपक्ष और देश का हर… pic.twitter.com/SutmUirCP8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 11, 2025
निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाला आज (11 ऑगस्ट) संसद परिसरातच रोखण्यात आले. बिहारमधील मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत 300 विरोधी खासदारांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. यादरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना संसद पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे जाऊ दिलं नाही. बॅरिकेडची भिंत उभा करत खासदारांना संसद परिसरातच रोखण्यात आले. यावेळी अनेक महिला खासदारांनी सुद्धा बॅरिकेड भेदून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही खासदारांसोबत धक्काबुकी झाल्याचा आरोपही करण्यात आला. संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला असून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली.
#WATCH दिल्ली: दिल्ली पुलिस ने राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राउत और सागरिका घोष सहित INDI ब्लॉक के कई सांसदों को हिरासत में ले लिया है जो SIR के खिलाफ प्रदर्शन कर रहे थे और संसद से भारत निर्वाचन आयोग तक मार्च निकाल रहे थे।
(सोर्स: AICC) pic.twitter.com/XDcXNXoUcU
— ANI_HindiNews (@AHindinews) August 11, 2025
डरपोक सरकार, प्रियांका गांधींचा हल्लाबोल
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल केला. व्होट चोर गादी सोड अशी बोचरी घोषणाही प्रियांका यांनी केली. प्रियांका म्हणाल्या की, हे सरकार घाबरलं आहे. सरकार डरपोक आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतले. निदर्शनादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. यावेळीृ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांनी मदत केली.
“गली-गली में शोर है-मोदी वोट चोर है” pic.twitter.com/VyGNVZ5mz9
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) August 11, 2025
आज जब हम चुनाव आयोग से मिलने जा रहे थे, INDIA गठबंधन के सभी सांसदों को रोका गया और हिरासत में ले लिया गया।
वोट चोरी की सच्चाई अब देश के सामने है।
यह लड़ाई राजनीतिक नहीं – यह लोकतंत्र, संविधान और ‘एक व्यक्ति, एक वोट’ के अधिकार की रक्षा की लड़ाई है।
एकजुट विपक्ष और देश का हर… pic.twitter.com/SutmUirCP8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 11, 2025
मकरद्वार येथून मोर्चा निघाला
संसदेच्या मकर द्वार येथून मोर्चा निघाला. खासदारांनी ‘मत बचाओ’ चे बॅनर घेतले होते. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, म्हणून निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी, परिवहन भवनाजवळ बॅरिकेड्स लावून मोर्चा थांबवण्यात आला. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. खासदारांना पुढे जाऊ दिले नाही तेव्हा ते रस्त्यावर बसले.
वोट चोरी के खिलाफ़ इस आंदोलन में INDIA के सभी साथी सांसदों को कंधे से कंधा मिलाकर, पूरी शक्ति के साथ लड़ने के लिए दिल से धन्यवाद।
जैसा कि मैंने कहा ये लड़ाई राजनीतिक नहीं है – लोकतंत्र, संविधान और मताधिकार की रक्षा की है और हम ये मिलकर हासिल करेंगे। pic.twitter.com/nhGdONgRKq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 11, 2025
तत्पूर्वी, आज निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले. निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता 30 जणांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी 12:00 वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेच्या कमतरतेमुळे, कृपया जास्तीत जास्त 30व्यक्तींची नावे द्या असे सांगण्यात आलं.
मात्र गेलो तर आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नाही तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता, असं विरोधकांचं म्हणण आहे.
मतदार यादीवरून वाद सुरूच
मतदार यादीतील अनियमिततेवरून, घोटाळ्यावरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी कालपासूनच याबाबत मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील लाँच केली. तसेच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केलं.
अनेक खासदार बॅरिकेड्सवर चढले आणि ते ओलांडून उड्या मारल्या, त्यात अखिलेश यादव यांचाही समावेश होता. तर टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा याही बॅरिकेड्सवर चढल्या. त्यानंतर अखिलेश यादवर हे ठिय्या देऊन बसले. तर निवडणूक आयोगाकडे फक्त 30 खासदार नाही तर आम्ही सर्व जाणार असं जयराम रमेश यांनी सांगितलं. पोलिसांनी जाऊ दिं तर आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊ, पण ते आम्हाला जाऊच देत नाहीयेत असं अखिलेश यादव म्हणाले.





