33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ प्लास्टिकमुळे होणा-या पर्यावरण,आरोग्य व आर्थिक परिणामावर आळा घालण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावे

प्लास्टिकमुळे होणा-या पर्यावरण,आरोग्य व आर्थिक परिणामावर आळा घालण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावे

0
170

blank

■ रोटरी क्लब पश्चिम नागपूरचे चेअरमन डॉ. जगदिश बारसागडे यांचे प्रतिपादन

देवरी,ता.१३: प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे ह्या ध्येयपूर्तीस्तव प्लास्टिकच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम सर्व लोकांपर्यंत पोहचविणे व पर्यायी वस्तूचा वापर करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे तसेच प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे परिणाम जसे, प्लास्टिक ही माती, पाणी आणि हवेला दुषित करते प्लास्टिक कचरा जनावरांसाठी हानिकारक आहे. प्लास्टिकला विघटित होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम होतो. कारण ज्या प्लास्टिक मधील हानीकारक रसायने आपल्या अन्नामध्ये मिसळून आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. म्हणून पर्यायी वस्तू कापडी पिशव्या,स्टीलच्या बाटल्या आणि बांबुच्या वस्तू सुध्दा वापर करून प्लास्टिकमुळे होणा-या पर्यावरण,आरोग्य व आर्थिक ह्या परिणामावर आळा घालण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन रोटरी क्लब पश्चिम नागपूरचे चेअरमन तथा बोरगाव/बाजार एकलव्य मॉडेल स्कूल आणि शासकिय कन्या आश्रम शाळेचे माजी प्राचार्य डॉ. जगदिश बारसागडे यांनी केले.
बारसागडे हे रोटरी क्लब पश्चिम नागपूर द्वारे जागतिक आदिवासी दिना निमित्य “प्लास्टिकला नाही म्हणा.” या उपक्रमा अंतर्गत बोरगाव/बाजार येथील एकलव्य मॉडेल स्कुल मध्ये जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सदरच्या “प्लास्टिक ला नाही म्हणा.” या जनजागृती कार्यक्रमात डॉ. जगदिश बारसागडे यांनी या क्षेत्राचे आमदार पुराम,देवरी पं.स.चे सभापती अनिल बिसेन, आदिवसी नेता रमेश ताराम, एकलव्य मॉडेल स्कुलचे प्राचार्य गणेशकुमार तोडकर यांना प्लास्टिकला नाही म्हणा लिहलेली कापडी पिशवी वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी आमदार पुराम यांनी प्लास्टिकला नाही म्हणा ह्या मानव कल्याण पर्यावरण पूरक उपक्रमाची स्तुती करून जागतिक आदिवासी दिनासाठी बाहेरून आलेल्या निवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना ह्या उपक्रमा विषयी जागृतीपर माहिती देऊन ह्या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करण्यास विनंती केली.
सदर उपक्रम रोटरी क्लब पश्चिम नागपूर चे प्रात:पाल देवेंद्र मते आणि कामुनिटी सर्विस समुदायसेवा चे डायरेक्टार मनोज नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाक् खाली रोटरी क्लबचे चेअरमन डॉ. जगदिश बारसागडे यांनी बोरगाव/बा.येथील शासकिय कन्या आश्रम शाळेचे प्राचार्य श्री खेडकर सर , बोरगाव/बा.चे सरपंच कल्पना देशमुख, देवरीचे वरिष्ठ पत्रकार नंदुप्रसाद शर्मा,तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले देवरी तालुक्यातील सर्व लोकांसह आदिवासी विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त, नागपूर येथील प्रकल्प कार्यालय,जेष्ठ नागरीक मंडळी,प्रचार्य, नगरपरिषद व नागपूर विद्यापीठ येथे कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणावर वाटप केले.
या कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. जगदिश बारसागडे यांनी सर्व जनतेला “प्लास्टिकला नाही म्हणा.” या उपक्रमात सहभाग घेवून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.