
गोंदिया,दि.१४- गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावांच्या लिलाव संदर्भात १३ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेत वाटाघाटीच्या माध्यमातून तलावांचे लिलाव करण्यात आले.तालुक्यातील नोंदणीकृत मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींनी या सभेत सहभाग घेतला. सन 2025-26 या कालावधीचे मत्स्यपालन करिता तलाव वाटाघटी करण्याची कार्यवाहीला सुरुवात करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र क्र. I/५३१३७३/२०२५ दिनांक ११/०८/२०२५ अन्वये दिनांक १३/०८/२०२५ रोजी पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद गोंदिया मालकीचे तलाव लिलाव व वाटाघाटी सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे, सहायक गटविकास अधिकारी महेंद्र के. मळामे, पंचायत समिती सदस्य अजाबराव रिणायत, विस्तार अधिकारी विनोद जाधव व सर्व मत्स्यपालन सहकारी संस्थांचे अध्यक्ष / सचिव/सदस्य /प्रतिनिधी उपस्थित होते.





