
गोंदिया,दि.१४- गोंदिया जिल्हा परिषदेतील बदल्या आणि प्रतिनियुक्त्या हा नेहमीच वादातीत विषय राहिला आहे.काही कर्मचारी तर ज्या विभागात गेले त्या विभागालाच आपला घर समजून बाहेर पडायला तयार नसल्याचे चित्र असतानाच गोंदिया जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात सडक अर्जुनी पंचायत समितीच्या लेखा विभागातील आकाश गवईचे काय काम या संदर्भात “पंचायत समिती सोडून गवई जि.प.च्या लेखाविभागात कसे ?” या मथळ्याखाली बेरार टाईम्सने ११ आॅगस्टला वृत्त प्रकाशित केले होते.त्या प्रकाशित वृत्तानंतर जिल्हा परिषद वित्त व लेखा विभागाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांनी दखल घेत पंचायत समिती सडक अर्जुनी येथून जिल्हा परिषदेत बोलविण्यात आलेल्या आकाश गवई नामक कर्मचार्याला तत्काळ कार्यमुक्त करीत परत पाठविले.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या या विभागासह अनेक विभागात असे कर्मचारी विभागीय आयुक्तांच्या विनापरवानगीने तळ ठोकून बसले असून संबधित पंचायत समितीतील कामकाज विस्कळीत झाले आहे.https://www.berartimes.com/vidarbha/214522/ पंचायत समिती सोडून गवई जि.प.च्या लेखाविभागात कसे ?





