32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ हम क्या चाहते आजादी” च्या घोषणांनी राणा भवन परिसर दुमदुमले-कॉम्रेड हिवराज उके

हम क्या चाहते आजादी” च्या घोषणांनी राणा भवन परिसर दुमदुमले-कॉम्रेड हिवराज उके

0
22

blank

भंडारा -: भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त भाकप कार्यालय राणा भवन भंडारा येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 ला सकाळी आठ पन्नास वाजता भाकप चे जेष्ठ पुढारी व ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक कॉम्रेड सदानंद यांच्या अध्यक्षतेखाली व भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
         याप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीता नंतर स्वातंत्र्य दिन चिरायू हो, हम क्या चाहते आजादी, पुंजीवाद से आजादी, जातिवाद से आजादी, बेकारी से आजादी, भूकमरी से आजादी, निजीकरण से आजादी, महिला अत्याचार और भेदभाव  से आजादी कर्जमुक्तीसाठी आजादी, स्मार्ट मीटर से आजादी, पट्टा पाहिजे, घरकुल पाहिजे आजादी, दूषित पाणी से आजादी, खराब रस्ते से आजादी, निराधारांचे अनुदान पाहिजे आजादी, संविधान विरोधी जन सुरक्षा कायदे से आजादी इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
     यानंतर कॉम्रेड हिवराज उके व कॉम्रेड सदानंद इलमे  यांचे मार्गदर्शन झाले. व सर्वांना शुभेच्छा दिल्या.    संचालन तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कौन्सिल सदस्य कॉम्रेड ताराचंद देशमुख यांनी केले. याप्रसंगी कॉम्रेड वामनराव चांदेवार, भगवान मेश्राम, शीतल नागदेवे, दीपक गजभिये, माणिकराव कुकरकर, छबीपाचे, सरस्वती देशमुख, उषा सूर्यवंशी, हरिदास जांगडे, राजू लांजेवार, गोपाळ चौपकर, मुकेश दुरगुडे, घनश्याम नागोसे, गणेश क्षीरसागर, गोपीचंद गोमासे, गोपीचंद मोहरकर, महानंदा गजभिये, पंचफुला गजभिये, ज्ञानेश्वर मानवटकर, किशोर मेश्राम, जयदेव सोनकुसरे, सौनक ईलमे, गौतम भोयर इत्यादींची उपस्थिती होती.

blank