
गोंदिया,दि.२०ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले यांची भेट घेत शिक्षकांच्या सर्विस बुक तयार करण्याकरीता विशेष शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली होती.त्या मागणीला सकारात्मक घेत सभापती रहागंडाले यांच्या उपस्थितीत सर्विस बुक तयार करण्यासाठी १८ आँगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करुन संबधित १४ शिक्षण सेवक व १० विशेष शिक्षकांना सर्विस बुक वितरित करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी मा.एम.एल.मेश्राम यांनी केले. तर सुत्रसंचलन मोरेश्वर बडवाईक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ यांनी केले. आभार विशेष शिक्षक राजकुमार गौतम यांनी मानले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून APMC संचालक चेतन बहेकार, बाबापाटील चौधरी, राजू रहांगडाले, संघाचे नेते केदार गोटेफोडे व विशेष शिक्षक विजय ठोकणे उपस्थित होते.





