40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता देशमुख हत्याकांडातील २ आरोपीना २४ तासातच गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

देशमुख हत्याकांडातील २ आरोपीना २४ तासातच गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

0
888

blank

गोंदिया,दि.२१: रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या घाटटेमणी जंगल परिसरात २० आँगस्ट रोजी विनोद देशमुख यांची हत्या करुन मृतदेह जंगलात फेकल्याची घटना उघडकीस आली होती.या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व रावणवाडी पोलिसांनी घटनेच्या २४ तासातच गुन्ह्याचा उलगडा करीत संशयीत २ आरोपींना ताब्यात घेतले आहे.सविस्तर असे की,विनोद देशमुख हे फार्म हाऊस येथून निघून रात्री पर्यंत घरी परत न आल्याने पत्नी व गावातील नागरिकांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळील जंगल भागात विनोद देशमुख मृत अवस्थेत आढळून आला.अज्ञात आरोपीतांनी कोणत्यातरी शस्त्राने डोक्यावर मारून गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केल्याने फिर्यादी हिरकणी विनोद देशमुख रा.मशिनटोला घाटटेमणी हिचे तक्रारीवरून पोलीस ठाणे रावणवाडी येथे अपराध क्रमांक- ४५३/२०२५ कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर खून प्रकरण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे, यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला.गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांची ३ पथके नेमण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुह्याच्या घटनास्थळी अत्यंत तत्परतेने भेट देऊन गुन्ह्याची सखोल माहिती घेत घटना करुन पसार झालेल्या आरोपींची इत्यंभूत माहिती घटनास्थळ परिसरातील लोकांकडून गोळा करून आरोपी इसम प्रशांत उर्फ लोकेश छनुलाल कावडे वय २५,कामेश चुन्नीलाल कावडे वय २८ दोन्ही राहणार वॉर्ड क्रमांक ३, गिरोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया यांना मौजा कालीमाटी येथून ताब्यात घेण्यात आले. खून प्रकरण गुन्हयाचे अनुषंगाने नमूद आरोपीना सखोल चौकशी विचारपूस केली असता मृतकाने साथीदारांसह आरोपी प्रशांत याचे घरी जाऊन त्यास व त्याचे वडिलांना काठ्यांनी मारहाण केली होती याबाबत आमगाव पोलीस स्टेशनला मृतकाविरुद्ध गुन्हा सुद्धा नोंद आहे. त्यानंतर मृताकासोबत वाद असल्याने त्यांचे आपसात पटत नव्हते व मृतक विनोद देशमुख हा नेहमी आरोपीचे गावात त्याचा वीटभट्टा असल्याने ये जा करीत आरोपीना शिवीगाळ करुन धमकी दयायचा.या कारणावरून दोन्ही आरोपींनी विनोद देशमुखचा खून करण्याचा कट चार ते पाच दिवसापूर्वी रचून दिनांक १९/०८/२०२५ रोजी रात्री २१. ०० वाजता सुमारास गिरोला ते मशिनटोला कडे जाणाऱ्या डांबरी रोडवर विनोद देशमुखला थांबवून चेहऱ्यावर लालमिर्ची पावडर टाकून लोखंडी तलवारीने डोक्यावर, पाठीवर, मानेवर मारून जीविनीशी ठार करून मृतकाचेच मोटरसायकल ने बाघनदी किनाऱ्याजवळ लंबाटोला गाव शिवारातील झुडपी जंगलात मोटर सायकलसह टाकून दिल्याची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे दिलेले निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा तत्परतेने शोध घेवून आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम अहेरकर, पोउपनि शरद सैंदाणे , स.फौ.राजेन्द्र मिश्रा, पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. संजय चव्हाण, पो.हवा. महेश मेहर, पो.हवा. सोमेन्द्रसिग तुरकर,पो.हवा.दिक्षीतकुमार दमाहे, पो.हवा. सुबोधकुमार बिसेन, पो.हवा. प्रकाश गायधने, पो.हवा.इंद्रजित बिसेन, पो.हवा. भोजराज बहेकार, पो शी . हंसराज भांडारकर, पो.शी संतोष केदार, पो शी राकेश इंदुरकर, पो शी दुर्गेश पाटील, मपोशी स्मिता तोंडरे, मपोशी कुमुद येरणे चापोहवा. लक्ष्मण बंजार, चापोशी राम खंदारे यांनी कामगिरी बजावली आहे.