30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक जि.प.अध्यक्ष भेंडारकरांची जि.प.शाळा मोहगाव तिल्लीला भेट

जि.प.अध्यक्ष भेंडारकरांची जि.प.शाळा मोहगाव तिल्लीला भेट

0
187
गोरेगाव,दि.२९ःतालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोहगाव तिल्ली येथे भेट देऊन शाळेच्या विविध वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शौचालये व अंगणवाडी विभागाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी(दि.२८)केली.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाविषयी विचारपूस केली. शिक्षकांशी चर्चा करून शैक्षणिक पातळी, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण साधने, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी डॉ. लक्ष्मण भगत अर्थ व बांधकाम सभापती, सूरजलाल पटले सरपंच, सुलोचना राऊत उपसरपंच, प्यारेलाल गौतम अध्यक्ष, शा. व्य. समिती तथा वि. सेवा सह. संस्था संतोष गौतम ग्रामपंचायत सदस्य, गीतेश्वर पटले ग्रामपंचायत सदस्य, पुष्पाताई जांभूळकर ग्रामपंचायत सदस्य, खिलेश्वर बोपचे ग्रामपंचायत सदस्य, केशोराव पटले उपाध्यक्ष शाळा व्य. स., रामभाऊ कटरे – उ. श्रे. मुख्याध्यापक, चुन्नीलाल गौतम, उपाध्यक्ष भाजपा गोरेगाव मंडळ, बाबुलाल गौतम माजी पोलिस पाटील, नारायण पटले, माजी अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था,रामेश्वर बोपचे, माजी अध्यक्ष शा. व्य. समिती,श्रीराम मेश्राम उपाध्यक्ष से. स. संस्था, राजेंद्र भगत , गोकर्ण वाघमारे , धनलाल मौदेकर , नंदकुमार पटले ,प्रमिलाताई चौधरी तसेच शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

blank