26.2 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

0
50

गोरेगांव- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव येथे 29 ऑगस्ट 2025 हा दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक छाया पी मेश्राम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच मॅनेजिंग डायरेक्टर वैभव कटरे,पर्यवेक्षक आर.बी.कोल्हे,क्रीडा शिक्षक आशिष रामटेके, स. शि. दिनेश कोल्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय खेळ दिवस निमित्त शाळेकडून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय खेळ दिवस निमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी आर.बी कोल्हे तसेच अध्यक्ष छाया पी मेश्राम यांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन लिनस पटले, खरांशू पटले तर आभार तक्षक पटले यांनी मानले.

blank