29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

0
29

गोंदिया, दि.30 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत शासन निर्णयातील तरतुदीनुसार समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेमार्फत राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्यांकडून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 अशी होती. तथापि, याद्वारे अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून आता अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 06.15 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे.

        तरी https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास दि.1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करावीत.

       अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in येथील ‘ताज्या घडामोडी’ या लिंकवर भेट द्यावी. सन 2025-26 करीता या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही. असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.

blank