
*तिरोडा,दि.०२- खा प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, पाल चौक गोंदिया येथे तिरोडा येथील काँग्रेस नेत्या वनिताताई ठाकरे यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजेंद्र जैन यांनी पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक धोरणांवर व सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे या तालुक्यात महिलांचे संघटन शक्ती वाढेल व पक्ष मजबूत होणार आहे. या प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, तालुका अध्यक्ष जगदीश बावनथडे, खुमेंद्र रहांगडाले, राजकुमार ठाकरे, कल्पनाताई दहीकर, मधुकर दहीकर, देवेंद्र चौधरी, मुन्नालाल बिंझाडे सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





