30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home क्रीडा दिव्ययोग फाउंडेशनचे दमदार प्रदर्शन, तीन खेळाडूंनी जिंकली पदके

दिव्ययोग फाउंडेशनचे दमदार प्रदर्शन, तीन खेळाडूंनी जिंकली पदके

0
28

गोंदिया,दि.०२:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने विभागीय क्रीडा संकुलात २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित ६ वी वरिष्ठ महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेत ३० जिल्ह्यांतील २५० हून अधिक महिला-पुरुष खेळाडूंनी २८ ते ५५ वर्षे वयोगटात आपली योगकला सादर केली.गोंदिया जिल्ह्याच्या दिव्ययोग फाउंडेशनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके जिंकून जिल्ह्याचा मान उंचावली आहे.यामध्ये रविशंकर नागपुरे – प्रथम,बरखा ईश्वर नेचवानी – तृतीय,दिव्या नितिन भोजवानी – प्रथम व वंदना श्रीचंद डोडानी हिने पाचवा क्रमांक पटकावले.या खेळाडूंनी आपल्या-आपल्या वयोगटात उत्तम योगासन सादर करून यश संपादन केले.विशेष म्हणजे, या विजेत्या खेळाडूंची निवड सप्टेंबर २०२५ मध्ये छत्तीसगड (दुर्ग) व विजयवाडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी करण्यात आली असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

blank